पुणे

पुण्यात ओमिक्रॉचे ४६ रुग्ण

CD

पुणे, ता. २ : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचे राज्यात ५० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४६ रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने रविवारी दिली. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ५१० रुग्ण आढळले असून, १९३ रुग्ण खडखडीत बरे झाले असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.
राज्यात रविवारी ओमिक्रॉनचा संसर्ग असणारे ५० रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी ३८ रुग्णांचे निदान भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) येथे झाले. तर, १२ रुग्णांचे निदान राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र(एनसीसीएस) यांनी केले आहे. या ५० रुग्णांपैकी ३६ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. आठ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील रहिवासी असून, पुणे जिल्ह्यातील दोन रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. उर्वरित चारपैकी दोन रुग्ण सांगली जिल्ह्यातील आणि ठाणे आणि मुंबई येथील प्रत्येकी एक रुग्ण असल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात राज्यातील ओमिक्रॉन रुग्ण
जिल्हा/मनपा आढळलेले रुग्ण
मुंबई .................३२८
पुणे मनपा ............४९
पिंपरी-चिंचवड .......३६
पुणे ग्रामीण ...........२३
ठाणे मनपा ............१३
नवी मुंबई, पनवेल ..... प्रत्येकी ८
कल्याण-डोंबिवली .................प्रत्येकी ७
नागपूर आणि सातारा .................प्रत्येकी ६
उस्मानाबाद ................५
वसई-विरार .................४
नांदेड .................३
औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली ................. प्रत्येकी२
नगर, अकोला, कोल्हापूर ................. प्रत्येकी १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT