पुणे

वाहनतळावर कर्मचाऱ्यांची मनमानी महात्मा फुले मंडई येथील स्थिती; नागरिकांची गैरसोय

CD

पुणे, ता. २ : महापालिका प्रशासनाचा कारभार कसा सुरू आहे, याचे आणखी एक उदाहरण महात्मा फुले मंडई येथील मिसाळ वाहनतळावरून समोर आले. वेळे आधी वाहनतळ बंद करणे, वाहनचालकांकडून जादा शुल्क घेणे, त्यांना दमदाटी करणे, असे प्रकार या ठिकाणी सुरु असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. यामुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महात्मा फुले मंडई, तुळशीबाग आणि परिसरात मोठी बाजार पेठ आहे. या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मंडई येथे महापालिकेकडून वाहनतळ उभारण्यात आले आहे. ते सध्या महापालिकेकडून चालविले जात आहे. परंतु महापालिकेचे नाव पुढे करून तेथील कर्मचारी ते वाहनतळ स्वत:च्या मालकीचे असल्याप्रमाणे वागत असल्याचे समोर आले आहे. याबाबत नागरिकांनी यापूर्वी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर देखील प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सध्या कुणाचाही धाक उरला नाही. त्याचा अनुभव अनेक अनेक वाहनचालकांना रविवारीही आला. नागरिकांना याबाबत ‘सकाळ’कडे संपर्क साधून तक्रारी केल्या. या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

या आहेत वाहनचालकांच्या तक्रारी
-वाहनतळ वेळे आधीच बंद केले जाते
-अडकलेल्या वाहनचालकांनाकडून दोन ते तीनशे रूपये घेतल्यानंतरच गाडी सोडली जाते.
-पावती एका रक्कमेची आणि आकरली जाणारी रक्कम वेगळीच असते
-जाब विचारणाऱ्या वाहनाचालकांना अरेरावीची भाषा वापरली जाते.
-वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून दखल घेतली जात नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT