पुणे

दोन परीक्षा एकाच दिवसी एमपीएससी, म्हाडाच्या पेपरबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

CD

पुणे, ता.२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा (२०२०) येत्या २२, २९ जानेवारी आणि ४, १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही परीक्षा नियोजित असताना त्या दरम्यान म्हाडाने विविध विभागातील पदभरतीसाठी परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून म्हाडाने परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी होत आहे.

परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर फुटीचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे गेल्या १२ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द झाली होती. ही परीक्षा जानेवारीमध्ये घेणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले होते. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच संकेतस्थळावर जाहीर केले आहे. म्हाडा विभागाच्या सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी २९ जानेवारीला परीक्षा होणार आहे. याच दिवशी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेचा ‘सामान्य अध्ययन’चा पेपर आहे. या दोन परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेस मुकावे लागणार आहे. यामुळे म्हाडाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करावी, असे विलास हाके याच्यासह विद्यार्थ्यांनी केली आहे.

पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ६५० रिक्त जागांसाठी मुख्य परीक्षेसाठी सुमारे ९ हजार ७५० उमेदवार पात्र ठरले आहेत. म्हाडाच्या विविध विभागातील १४४ पदांसाठी ५६५ रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या परीक्षेसाठी दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

पीएसआय मुख्य परीक्षेचा सामान्य अध्ययन पेपर आणि म्हाडाची परीक्षा एकच दिवशी आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे म्हाडने परीक्षेची तारीख बदलून द्यावी.
- भंगवत भोसले, विद्यार्थी

गट ब मुख्य परीक्षा २०२० नियोजित असताना म्हाडाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना इतर परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेतले नाही. म्हाडाने नियोजन करताना याची माहिती घेणे आपेक्षित होते.
- अभिजित ढोरे, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT