पुणे

हुश्श... लस मिळाली चिंता मिटली

CD

पुणे, ता. ३ : घरात आई, बाबांसह सर्वांनी लस घेतली, ते सुरक्षीत झाले, पण आम्ही शाळेत जातो, ट्यूशनला जातो आमचे लसीकरण झाले नसल्याने १८ पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलामुलींमध्ये कोरोनाची भीती होतीच. आज पहिल्याच दिवशी शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी मुलांची पावले वळाली. १०-१५ मिनिटात लस घेऊन बाहेर आल्यावर ‘लस मिळाली, चिंता मिटली’ असेच काहीसे समाधान या मुलांच्या चेहऱ्यावर होते.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार आजपासून (ता. ३) पुण्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. पुणे शहरात सुरवातीला ५ केंद्र निश्‍चीत केले होते, पण ही संख्या अपुरी आहे. गर्दी होण्याची शक्यता असल्याने आता ही संख्या ४० करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्यास सुरवात झाली. शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदींच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ झाला.

शासनाने थेट शाळा सुरू केल्याने मुलांना शाळेत जावे लागत आहे, पण लसीकरण झाले नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच आत रुग्णसंख्या वाढायला सुरवात झाल्याने धाकधूक वाढली आहे. १ जानेवारीपासून कोवीन ॲपवर आॅनलाइन नोंदणी सुरू झाली, तर आज सकाळी आठ वाजता लसीकरण केंद्रावरील स्लॉट निवडून लसीकरणासाठी नंबर लावला. तसेच ज्यांनी आॅनलाइन स्लॉट बुक केला नाही त्यांनी थेट लसीकरण केंद्रावर येऊन लस घेतली
सकाळी लसीकरण मोहीम सुरू होत असताना महापालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षकांकडून मुलांना व्यवस्थित माहिती दिली जात होती. मुले लस घेणार असल्याने पालक देखील त्यांना मानसिक आधार देण्यासाठी लसीकरण केंद्रांवर आले होते. केंद्रावर फारशी गर्दी नसल्याने व योग्य नियोजन केले गेले असल्याने १० ते १५ मिनिटात लस घेऊन मुले बाहेर येत होती. दुपारपर्यंत बहुतांश केंद्रावर १०० पेक्षा जास्त जणांचे लसीकरण झाले होते.

‘‘गेल्या दीड वर्षापासून कोरोना आहे, त्यामुळे शाळेत जाताना किंवा इतर ठिकाणी काळजी घ्यावी लागते. घरात आईबाबा सर्वांचे लसीकरण झाले आहे, आता मी देखील लस घेतली, मला त्यामुळे आता सुरक्षीत वाटत आहे.’’
-इशान नेर्लेकर, इयत्ता ९वी, ज्ञानप्रबोधिनी

‘खर मोठ्या लोकांसोबत आमचेही लसीकरण यापूर्वीच सुरू करायला पाहिजे होते. आज पहिल्याच दिवशी लस घेतली, त्यामुळे थोडी काळजी कमी झाली आहे.’’
- व्यंकटेश मिरासदार, इयत्ता १०वी, एक्स्टर्नल

‘‘माझी आता १२वीची परीक्षा सुरू होणार आहे, त्यापूर्वीच लस घेतल्याने सुरळीतपणे परीक्षेला जाता येईल. पहिल्याच दिवशी लस मिळाली याचा आनंद आहे.’’
रंजना भट, इयत्ता १२वी, झील महाविद्यालय

विना अडथळा लसीकरणास प्रारंभ
मोठा टप्पा पार केल्याने लसीकरण करताना येणारे अडथळे किंवा इतर तृटी कशा टाळल्या पाहिजेत याचा अनुभव आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. त्यामुळे मुलांचे लसीकरण करताना पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत की गोंधळ निर्माण झाला नाही. कर्मचारी मुलांना व्यवस्थित सहकार्य करत होते. तर लस घेतल्यानंतर त्रास होऊ नये यासाठी गोळी घेऊन आराम करा असा सल्लाही यावेळी देण्यात येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT