पुणे

भिडेवाडा ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावा; जिजाऊ ब्रिगेडची मागणी

CD

पुणे, ता. ३ ः महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहोचवली. ज्या फुले दांपत्यांनी अनेक अडचणींचा सामना करत मुलींसाठी भिडेवाड्यामधून शिक्षणाची दारे खुली करून दिली, अशा ऐतिहासिक भिडेवाड्याची अवस्था आज खूपच दयनीय झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने भिडेवाड्याची जमीन भूसंपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने पत्रकार परिषदेत केली.
यावेळी नीता होले फुले (वंशज), संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख क्षिप्रा मानकर, प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनीता शिंदे, राजश्री शितोळे आदी उपस्थित होत्या. भदाणे म्हणाल्या, ‘‘स्त्री शिक्षणाचे शक्तिस्थान असलेल्या या वास्तूमुळे सर्व स्त्रियांना प्रेरणा मिळते. या ठिकाणची दुरवस्था होणे, हे अपमानजनक व खेदजनक बाब आहे. शासनाने मुलींची पहिली शाळा असलेली भिडेवाड्याची इमारत लवकरात लवकर सुशोभित करावी. तसेच महिलांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करत राज्यभरातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू मुलींसाठी येथे वसतीगृह स्थापन करावे. अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर जनआंदोलन करण्यात येईल.’’

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडतर्फे राज्यभर या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा, तालुक्यात महिला निदर्शने, धरणे आंदोलन तसेच शासनास निवेदन देणार असल्याचे मानकर यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT