पुणे

एक हजार शेतकऱ्यांना कृषी निर्यातीचे प्रशिक्षण देणार

CD

पुणे, ता. ३ : ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर यांच्यावतीने जिल्ह्यातील एक हजार इच्छुक शेतकऱ्यांना ‘शेतकरी उत्पादक ते कृषी निर्यातदार’ विषयक प्रशिक्षणाचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर येथे आयोजन केले आहे.

शेतमाल उत्पादनाच्या निर्यातीमुळे शेतकऱ्यांना जास्त दर मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी प्रति तालुका ५० निर्यातदार शेतकऱ्यांचे एक दिवसीय निर्यातदार प्रशिक्षण घेणार आहे. निर्यातदार युवक हा ‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा. कमाल ४० वर्षे वयोमर्यादा, इयत्ता दहावी उत्तीर्ण, व्यवसाय करण्याची इच्छा असणारा शेतकरी असावा. प्रति गाव एक इच्छुक शेतकरी या निकषानुसार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. निर्यात संधी, विपणन आणि ब्रँडिंग, निर्यात प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे, अर्थ व्यवस्थापन आणि कृषी निर्यात योजना हे निर्यातदार प्रशिक्षणातील विषय असणार आहेत.
इंदापूर तालुक्यासाठी ५ जानेवारी आणि १७ फेब्रुवारी, भोर ६ जानेवारी, जुन्नर १२ जानेवारी व २३ फेब्रुवारी, खेड १३ जानेवारी, पुरंदर १९ जानेवारी व २४ फेब्रुवारी, बारामती २० जानेवारी व २ मार्च, हवेली २७ जानेवारी, शिरूर २८ जानेवारी व ३ मार्च, मुळशी २ फेब्रुवारी, वेल्हा ३ फेब्रुवारी, मावळ ९ फेब्रुवारी व ९ मार्च, आंबेगाव १० फेब्रुवारी, दौंड १६ फेब्रुवारी आणि १० मार्च रोजी प्रशिक्षण आयोजित केले आहे.
शेतकरी नोंदणी मर्यादित असल्यामुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्व नोंदणी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी देण्यात आलेल्या गुगल फॉर्मद्वारे माहिती भरावी. तसेच, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पूर्व नोंदणी करून प्रशिक्षण सत्रात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे (०२० -२५५३०४३१) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT