पुणे

‘स्वरपर्व’ने जिंकली रसिकांची मने

CD

पुणे, ता. ३ ः आश्वासक व नव्या दमाच्या स्वरांनी सजलेली नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारची संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पुण्यातील तालानुभूती फाउंडेशनतर्फे आयोजित ‘स्वरपर्व’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. कार्यक्रमात सहभागी नव्या दमाच्या आश्वासक कलाकारांनी आपण अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे पुढे नेऊ शकतो, याची झलक उपस्थितांना दाखविली. रसिक श्रोत्यांनीही या कलाकारांना भरभरून दाद दिली.
रोहन बिल्डर्सचे संचालक अभिषेक भटेवरा, प्रसिद्ध तबलावादक पं रामदास पळसुले, श्रीनिवास जोशी, राजस उपाध्ये, तालानुभूती फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध तबलावादक रोहित मुजुमदार, सचिव सुधीर दर्भे, विश्वस्त कैलास देवधर, खजिनदार मृणालिनी मुजुमदार आदी या वेळी उपस्थित होते. मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर शाळेच्या आवारातील एमईएस सभागृहात हा कार्यक्रम झाला.
उदयोन्मुख कलाकारांचा कलाविष्कार रसिकांना एकाच व्यासपीठावर अनुभवता यावा या उद्देशाने मुजुमदार यांनी ‘स्वरपर्व’ हे व्यासपीठ तयार केले असून, यंदाच्या कार्यक्रमात तरुण आश्वासक कलाकारांवर भर देत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व प्रमुख आणि साथसंगत करणाऱ्या कलाकारांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांचे १८ वर्षीय नातू व गायक श्रीनिवास जोशी यांचे सुपुत्र विराज जोशी यांच्या गायनाने झाली. त्याला सौरभ क्षिरसागर (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), शिवाजी डाके (तालवाद्य) यांनी साथसंगत केली.
यानंतर भेंडी बाजार मोरादाबाद घराण्याचे २४ वर्षांचे तरुण सतार वादक मेहताबअली नियाझी यांनी वादन सादर केले. त्यांना आशय कुलकर्णी यांनी सर्मथ अशी तबला साथ केली. कार्यक्रमाची सांगता घोष घराण्यातील सर्वांत तरुण कलाकार ईशान घोष यांच्या एकल तबला वादनाने झाली. अभिषेक शिनकर यांनी संवादिनी साथ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT