पुणे

तळवडे येथील कंपनीला आग

CD

पिंपरी, ता. ११ : तळवडेजवळील एका कंपनीला सोमवारी (ता. ११) दुपारी अचानक आग लागली. त्यात कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या कंपनीत कागद व प्लास्टिकचा माल मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे काही क्षणातच आग भडकली. दूरपर्यंत धूर व आगीचे लोट पसरले होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाच्या सात गाड्या तसेच बजाज कंपनी, महिंद्रा कंपनी, पीएमआरडीए व एमआयडीसीची प्रत्येकी एक अशा एकूण अकरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरवातीला मोठ्या प्रमाणात पाण्याची फवारणी केली. त्यानंतर बुलडोजरच्या साहाय्याने पत्रे व भिंत हटवली. त्यानंतर अखेर तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
घटनस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. दरम्यान, शेजारील गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आठवडाभरातील आगीची ही तिसरी मोठी घटना आहे. मोशीतील कचरा डेपोसह झाडूच्या गोदामाला लागलेल्या आगीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

SCROLL FOR NEXT