पुणे

पुण्यात ढगाळ वातावरणाची शक्यता

CD

पुणे, ता. ३ ः पुणे शहर आणि परिसरात पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी होणार आहे. शहरात सोमवारी २९.७ कमाल आणि १४.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पश्‍चिमी चक्रावात आणि त्यात अरबी समुद्रातील बाष्प पुरवठ्यामुळे शहर आणि परिसरावर ही याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. शहरात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत किमान तापमान १७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमानात काहीशी चढ-उतार कायम राहील.
राज्यात किमान आणि कमाल तापमानात होणारी वाढ यामुळे गारठा कमी झाला आहे. दरम्यान हे चित्र असेच कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पश्‍चिमी चक्रावातामुळे वायव्य आणि मध्य भारतातील राज्यात पावसासाठी पोषक हवामानाची निर्मिती होत असून त्यातच अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
सध्या उत्तर भारतात गारठा कमी झाला असून राजस्थान व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होऊ शकते. परिणामी मध्य आणि वायव्य भारतात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यावर ही होणार आहे. राज्यातील काही भागात ६ ते ७ जानेवारी दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर, येत्या २४ तासानंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सर्वाधिक कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस रत्नागिरी तर नीचांकी तापमानाची नोंद वाशीम येथे ११ अंश सेल्सिअस इतकी झाली. बहुतांश भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात वाढ पाहायला मिळाली असून किमान तापमान १४ ते २२ अंशापर्यंत नोंद गेले.

हवामान दृष्टिक्षेपात
- जानेवारी २०२२ मध्ये वायव्य, ईशान्य आणि पूर्व भारतात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता
- मध्य भारतातील काही भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
- जानेवारी ते मार्च दरम्यान उत्तर भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT