पुणे

शाळा बंदचा निर्णय पालकमंत्र्यांच्या कोर्टात

CD

पुणे, ता. ३ ः नाताळच्या सुटीनंतर शहरातील शाळा आजपासून (ता. ३) सुरू झालेल्या असताना लगेच, त्या बंद करण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आम्ही शाळा बंद करण्यासाठी सकारात्मक आहोत. पण, याचा निर्णय घेण्यासाठी उद्या (ता. ४) पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये मागणी केली जाईल, असे स्पष्ट केले.

पुणे महापालिकेने १६ डिसेंबर पहिली ते सातवीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. पण, २५ डिसेंबरपासून नाताळची सुट्टी सुरू होती. तसेच पालकांचे संमतिपत्र न मिळाल्याने अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नाताळच्या सुटीनंतर म्हणजेच ३ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज शाळा सुरू झाल्या. त्याच दरम्यान, गेल्या आठवड्यापासून महापालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे. त्यासंदर्भाने महापालिकेत आज झालेल्या बैठकीत शाळा बंद करण्याबाबत चर्चा केली.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने शाळा बंद करून त्या आॅनलाइन सुरू करण्याबाबत नक्कीच विचार करावा लागेल. पालक संघटना, बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून शाळा आॅनलाइ सुरू करण्याची मागणी केली जात आहे, तसे निवेदनही आले आहेत. पालकमंत्री अजित पवार यांची बैठक मंगळवारी (ता. ४) होत आहे. त्यामध्ये ही मागणी मांडली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT