पुणे

सुपेंचा चालक, सावरीकर यांच्यातील चॅटिंग पोलिसांच्या हाती

CD

पुणे, ता. ३ : महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंचा चालक आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात झालेले मोबाईलमधील चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात परिक्षेतील गैरव्यवहाराबाबत बोलणे झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या सुपेंचा चालक व लातूरमधून अटक केलेला एजंट यांच्या पोलिस कोठडीत सहा जानेवारीपर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे.

सुनील खंडू घोलप (वय ४८) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय ४५, रा. लातूर) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात सुपेंचा चालक सुनील घोलप व एजंट मनोज डोंगरे यांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांची सहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीची मुदत वाढविली आहे. दरम्यान, पोलिस तपासात चालक सुनील आणि तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्यात झालेले मोबाईल चॅटिंग सापडले आहे. त्यात परिक्षेतील गैरव्यवहाराबाबत बोलणी झाली असल्याचे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपींच्या मोबाईलच्या विश्लेषणाचे काम सुरू असून त्यामध्ये येणाऱ्या माहितीच्या आधारे त्यांकडे तपास करायचा आहे. डोंगरे याने देशमुख याकडून पैसे स्वीकारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ती त्याने कशासाठी स्वीकारली यासह गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT