पुणे

विमानतळ प्रकल्पाचे उड्डाण लांबणीवर

CD

पुणे, ता. ५ : पुरंदर तालुक्यातील नवीन प्रस्तावित जागेवरील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी दिलेली ‘साइट क्लिअरन्स’ची मंजुरी रद्द केली आहे. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने खासदार गिरीश बापट यांच्यामार्फत नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र दिले होते. या संदर्भात शिंदे यांनी पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, पुणे जिल्ह्यातील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत पुरंदर येथे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळासाठी ‘साइट क्लिअरन्स’ मंजुरीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मंत्रालयाने ९ मे २०१८ रोजी राज्य सरकारला ‘साइट क्लिअरन्स’ मंजुरी दिली. तथापि, भूसंपादनाच्या अडचणींमुळे राज्य सरकारने प्रस्तावाचा आढावा घेतला. त्यानंतर पुरंदर येथील पूर्वीच्या जागेपासून दहा किलोमीटर अंतरावर नवीन जागेसाठी पुन्हा अर्ज सादर करण्यात आला. ग्रीनफिल्ड विमानतळ धोरण २००८ नुसार संरक्षण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्याशी सल्लामसलत करून या प्रस्तावाची तपासणी करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ रोजी ‘साइट क्लिअरन्स’ला मंजुरी दिली होती. परंतु नवीन प्रस्तावित जागेसाठी दिलेली मंजुरी २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला कळविल्याचे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

पुरंदर तालुक्यातील नवीन प्रस्तावित जागेवरील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात ती रद्द करण्यात आली आहे. मात्र, यामुळे पुरंदर तालुक्यातील मूळ जागेच्या प्रस्तावाला काही अडचण येणार नाही.
- खासदार गिरीश बापट, अध्यक्ष, विमानतळ सल्लागार समिती

संरक्षण मंत्रालयाने पुरंदर तालुक्यातील नवीन प्रस्तावित जागेवरील आंतरराष्ट्रीय विमानतळाची मंजुरी रद्द केली आहे. याचा अर्थ नवीन जागेवरील हा प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे पुण्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे होणार, हे स्पष्ट करावे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून नवीन विमानतळासाठी जागा निश्चित करावी.
- सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर

पुणे विमानतळाच्या प्रस्तावाबाबत केंद्र आणि राज्य सरकार निर्णय घेते. जिल्हा प्रशासनाकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे.
नवीन प्रस्तावित विमानतळाच्या साइट क्लिअरन्सची मंजुरी रद्द केल्याची माहिती प्रशासनाला अद्याप उपलब्ध झालेली नाही.
- राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! सलग 4 दिवसांच्या तुफान तेजीला ब्रेक; आता 10 ग्रॅमचा नवा भाव किती?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

FIFA World Cup: सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा बचाव भेदण्यास स्पेन अपयशी! दिवसातले चारही सामन्यांमध्ये बरोबरी

फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

SCROLL FOR NEXT