पुणे

जम्बो रुग्णालय दोन ते तीन दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार

CD

पुणे, ता. ५ : पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरवात झाल्याने शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत रुग्णालयात कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे.
जम्बो रग्णालयात विविध प्रकारचे एकूण ८०० बेड आहेत. त्यातील २०० बेडवरील आरोग्य सुविधा सुरवातीला कार्यान्वित करण्यात येणार आहे. यात सुमारे ५० आयसीयू तर २० व्हेंटिलेटर खाटांचा समावेश असेल. त्यानंतर गरज पडल्यास इतर प्रकारचे बेड देखील उपलब्ध केले जाणार आहे. जम्बोमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टरांची नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता त्यांना आवश्‍यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्‍यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर जम्बोमधील उपचार थांबविण्यात आले होते. तर महापालिकेच्या बाणेर येथील रुग्णालयात सध्या कोरोना बाधीतांवर उपचार सुरू होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जम्बो पूर्ण क्षमेतेने सुरू होते. राज्यभरातून येथे रुग्ण दाखल झाले होते. त्यामुळे आरोग्य सेवेसाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरले होते. पुन्हा दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यास सज्ज राहण्याची तयारी या माध्यमातून पालिका प्रशासन करीत आहे.

वापर करण्यासाठी सुस्थितीत
दुसरी लाट कमी झाल्यानंतर हे रुग्णालय पूर्णतः बंद होते. त्यामुळे या रुग्णालयाचा आणखी वापर करता येवू शकतो का याचे ऑडिट करण्यात आले होते. रुग्णालय सुस्थिती असल्याने ऑडिटमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याचा पुन्हा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, जम्बोमधील बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी कॉल सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहे. बेड व इतर मदतीची माहिती या कॉल सेंटरद्वारे दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT