पुणे

दिव्यांगांच्या विवाहासाठी अर्थसाहाय्य योजनेसाठी सरकार सकारात्मक ः मुंडे

CD

पुणे, ता. ५ : ‘‘दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तीप्रमाणे सुखकर व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी त्यांना विशेष अर्थसाहाय्य योजना सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे,’’ अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या सहकार्याने आज निसर्ग कार्यालयात हा सोहळा पार पडला.

दिव्यांग आणि वंचित बांधवांचे विवाह जुळवण्यासाठी शासन स्तरावर योजना नाही, तसे धोरण आखायला हवे, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यावर पुढील आठवड्यात बैठक घेऊन धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.

मुंडे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे आणि खासदार सुळे या कोरोना बाधित असून, सध्या विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमास ऑनलाइन हजेरी लावली. या कार्यक्रमास राज्य महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी महापौर प्रशांत जगताप, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.
हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संयोजक विजय कान्हेकर, रश्मी कामतेकर, सतीश पवार, संघटक अभिजित राऊत, समन्वयक दीपिका शेरखाने, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे नंदकुमार फुले, भाग्यश्री मोरे, मिनिता पाटील, दत्ता भोसले, विशेष शाळांचे सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष योगदान दिले.

दिव्यांग नोंदणी व यूडीआयडी राज्यव्यापी मोहीम
दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे यूडीआयडी कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे दिव्यांगांची या मोहिमेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी आरोग्य विभाग सहकार्य करेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

Latest Marathi News Live Update : - सोलापूरच्या सिंदगीजवळ भीषण अपघात

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT