पुणे

कोरोना रुग्णांत महिनाभरात दहा पटीने वाढ

CD

पुणे, ता. ५ ः पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांत गेल्या ३० दिवसांत दहा पटीने वाढ झाली आहे. बुधवारी (ता. ५) शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ३२० इतकी झाली आहे. हीच संख्या महिनाभरापूर्वी ७४२ इतकी होती. दिवसातील नवीन कोरोना रुग्णांतही ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शहर व जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.
सध्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या कमी होऊ लागली आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. आवश्‍यक खबरदारी घ्यावी. यासाठी मास्कचा नियमित वापर करणे, वारंवार हात धुणे, गर्दीत जाणे टाळावे आणि लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात त्वरित जावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
महिनाभरापूर्वी म्हणजेच ६ डिसेंबरला पुणे शहरात एका दिवसात केवळ ३८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. हीच बुधवारी दिवसातील रुग्ण संख्या १ हजार ८०५ वर गेली आहे. यामुळे महिनाभरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा फरक १ हजार ७६७ इतका झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात १२ हजार ८१० इतकी झाली आहे.

शहरातील महिनाभरातील कोरोना स्थिती
तीस दिवसांपूर्वी दिवसातील नवे रुग्ण ः ३८
तीस दिवसांनंतर दिवसातील नवे रुग्ण ः १ हजार ८०५
महिन्यापूर्वीचे एकूण कोरोनाबाधित ः ५ लाख ७ हजार १७४
महिनाभरानंतर बुधवारपर्यंतचे कोरोनाबाधित ः ५ लाख १४ हजार ४९४
महिन्यात वाढलेले कोरोना रुग्ण ः ७ हजार ३२०
गेल्या ३० दिवसातील कोरोना चाचण्यांची संख्या ः १ लाख ८८ हजार ८३८
आतापर्यंत झालेल्या एकूण कोरोना चाचण्या ः ३९ लाख सहा हजार ३२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

SCROLL FOR NEXT