पुणे

पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या तीन हजार

CD

पुणे, ता. ५ ः पुणे जिल्ह्यातील एका दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी (ता. ५) पुन्हा तीन हजारांच्या घरात पोचली आहे. जिल्ह्यात दिवसभरात एकूण दोन हजार ८१३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट फक्त २२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा कोरोना मृत्यू जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहे.
जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १ हजार ८०५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ५९०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २८१, नगरपालिका हद्दीत ८० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील १३१, पिंपरी चिंचवडमधील २७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४१, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ११ जणांचा समावेश आहे.
सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात ८ हजार २०१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित ७ हजार ३८३ जण गृह विलगीकरणात आहेत. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ५ हजार ४६४ रुग्ण आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी ४४७ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. उर्वरित ५ हजार १७ जण गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT