पुणे

कंटेनरच्या धडकेत तरुणाची मृत्यू

CD

पुणे, ता. ६ ः महाविद्यालयात निघालेल्या तरुणीच्या दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या कचरा घेऊन जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मुकुंदनगर परिसरात घडली.
कश्‍मिरा प्रशांत भंडारी (वय २०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. कश्‍मिरा मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. कंटेनरचे चाक अंगावरुन गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी तेथील सोसायटीचे सुरक्षारक्षक व स्वच्छ संस्थेच्या महिला कर्मचाऱ्याने कश्‍मिराला उपचारांसाठी रिक्षातून तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी खासगी रुग्णालयाने तिला उपचारांसाठी दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तिला ससून रुग्णालयात नेले. तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तिला बारावीत ९५ टक्के गुण मिळाले होते. तिने राज्यस्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला होता.याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...तर तरुणीचा जीव वाचला असता!
स्थानिक नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी व्हेईकल डेपोतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आणण्याबाबत, तसेच संबंधित वाहनांच्या बाहेर पडण्यासाठी ठराविक वेळ देण्याविषयी आणि अवजड वाहनांना बंदी घालण्याबाबत महापालिकेला यापूर्वी पत्र दिले होते. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही.

रस्ता अरुंद असतानाही तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. बेकायदा वाहने पार्किंग केले जातात. ठिकठिकाणी रिक्षा थांबे आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तसेच स्थानिक नागरीकांना वाहने चालविणे आणि रस्ता ओलांडणे जिकीरीचे जाते.
- विजय पोफळे, स्थानिक नागरीक

कचरा डेपोच्या गाडीच्या धडकेमध्ये आमची कश्‍मिरा गेली. या परिसरात मोठ्या सोसायट्या, शाळा, महाविद्यालये आहेत. भविष्यात अशी वेळ कोणावर येऊ नये, त्यादृष्टीने महापालिका, वाहतुक पोलिसांनी योग्य कारवाई करावी.
- हर्षल भंडारी, कश्‍मिराचे काका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT