पुणे

मध्य भागातील पाणीपुरवठा विस्कळितच सुरळीत झाल्याचा महापालिकेचा दावा; नागरिकांच्या तक्रारी कायम

CD

पुणे, ता. २४ : शहरातील सर्व पेठांसह परिसरात रविवारी विस्कळित झालेला पाणीपुरवठा सोमवारी सकाळपासून पूर्ववत झाला. जुन्या जलवाहिन्यांना नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत महापालिकेकडून करण्यात आल्याने, सोमवारची संभाव्य पाणी बंदची वेळ टळली गेल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला. प्रत्यक्षात सोमवारीदेखील काही भागात कमी दाबाने तर काही भागात पाण्याचा पुरवठा झाला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

बाजीराव रस्त्यावरील जलवाहिनी बदलताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे वाया जाणारे पाणी बंद करण्यासाठी, पर्वती मुख्य जलवाहिनीमधून येणारे मुख्य जलवाहिनीचे व शहरातील अन्य विविध ठिकाणचे पाण्याचे वॉल्व्ह बंद करण्यात आल्याने सर्व पेठांमधील व परिसरातील पाणीपुरवठा बंद झाला होता.

मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा जास्त काळ बंद राहू नये, तसेच पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत ते पूर्ण करण्यात आल्याने रविवारी रात्रीपासूनच काही पेठांमधील व सोमवारी पहाटेपासून शहरातील सर्व मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, बुधवार पेठेसह काही भागात आजही पाणीपुरवठा विस्कळित झाला. या ठिकाणी कमी दाबाने तर काही भागांत पाणीच आले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT