sakal
sakal
पुणे

आणखी आठ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

CD

ओमिक्रॉनचा प्रभाव सौम्य असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. संक्रमण झाल्यास विलगीकरण करा आणि उपचार घ्या, इतकी साधी कार्यपद्धती आहे.

- डॉ. गजानन एकबोटे, एम.एस., प्राध्यापक, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

ओमिक्रॉनचा (Omicron) प्रभाव सौम्य असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. संक्रमण झाल्यास विलगीकरण (Separation) करा आणि उपचार घ्या, इतकी साधी कार्यपद्धती आहे. या वेळी कोरोनाचा (Corona) सामना करण्यासाठी आपण अधिक सक्षम आहोत. कारण, लसीकरणामुळे (Vaccination) आपली रोगप्रतिकारशक्ती चांगलीच वाढली आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेला ओमिक्रॉन हा प्रकार फुफ्फुसांवर (Lever) फारसा परिणाम न करता मुख्यत्वे वरच्या श्वसनमार्गावर आणि वायुमार्गांवर परिणाम करतो. ज्यांना इतर गंभीर आजार नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये. तसेच रुग्णालयातील खाटा अडवू नयेत. रुग्णांनी घरीच स्वतंत्र खोलीत राहण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण, ओमिक्रॉन या नवीन विषाणूच्या प्रकारामुळे पूर्ण बरे होण्यास लागणारा वेळ कमी आहे. (dr gajanan ekbote writes fight against Omicron)

ओमिक्रॉनचा फुफ्फुसांऐवजी वरच्या श्वसनमार्गावर आणि वायुमार्गांवर परिणाम होत आहे. म्हणूनच ऑक्सिजनची पातळी कमी झालेले किंवा डेल्टा प्रकारामध्ये आपण पाहिलेले इतर गंभीर लक्षणे असलेले रुग्ण खूप कमी दिसतात. ताप येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे आणि खूप अंगदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे आपण येथे पाहत आहोत. यापैकी कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास, अशा रुग्णांनी पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी. कारण मग ते स्वतःला वेगळे ठेवू शकतात आणि समाजातील इतर लोकांमध्ये संसर्ग पसरण्यापासून रोखू शकतात.

देशातील फुफ्फुस रोगतज्ज्ञ आणि भारताच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गुलेरिया यांनी यावर जोर दिला की, ज्यांना गंभीर आजार होण्याची अधिक शक्यता आहे, त्यांच्यासाठी रुग्णालयातील खाटा मोकळ्या राहिल्या पाहिजेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी रुग्णालयामध्ये दाखल होण्याची गरज नाही.

बरे होण्याची प्रक्रिया जलद...

या आजारांमध्ये बरे होण्याची प्रक्रिया खूप जलद होते. ८० ते ९० टक्के रुग्ण पाच ते आठ दिवसांमध्ये बरे होत आहेत. भूतकाळातील संसर्गापासून उच्च पातळीच्या प्रतिकारशक्तीमुळे आणि दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचे संरक्षण ६० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीला आपला देश अधिक चांगल्या स्थितीत आहे. लसीकरण मोहिमेमुळे जवळपास ८० टक्के प्रौढ लोकसंख्येला दुहेरी लसीकरण केले जाते. नैसर्गिक संसर्गामुळे मोठ्या संख्येने लोकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळाली आहे आणि सिरो सर्वेक्षण माहिती असे सांगते की, आमच्या लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे. दुसरे असे की, आपण वैद्यकीय सुविधांच्या बाबतीतही चांगले तयार आहोत. मग ते मेडिकल ऑक्सिजन प्लांट्स असोत, आयसीयू बेड्स असोत, व्हेंटिलेटर असोत, रेमडिसिव्हर इंजेक्शन असो, तयारी आणि प्रतिकारशक्तीच्या बाबतीत आपण चांगल्या स्थितीत आहोत.

ओमिक्रॉनबद्दल हे निश्चित आहे..

  • सौम्य लक्षणे, अति गंभीर आजार नाही

  • ऑक्सिजनच्या पातळीत सहसा घट होत नाही

  • लसीकरणामुळे संरक्षण मिळते

हे टाळा

  • विनाकारण घाबरणे

  • रुग्णालयातील खाटा अडविणे

  • गर्दीत जाणे

हे करा

  • लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करा

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरणात उपचार घ्या

  • मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आणि वारंवार हात स्वच्छ धुवा

  • लसीकरण तातडीने पूर्ण करा

रोगाची लक्षणे उपचारपद्धती

(सूचना - डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत)

  • लक्षणे नसलेला - उपचारांची शिफारस केलेली नाही. रुग्णालयात दाखल होण्याची जरुरी नाही.

  • सौम्य-मध्यम रोग - मोलनुपिरावीर दिवसातून दोन वेळा, पाच दिवस (२०० मिलिग्रॅमच्या चार गोळ्या)

  • गंभीर रोग - डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT