पुणे

देहूरोडमध्ये मालमत्तेच्या कारणावरून एकाला मारहाण

CD

पिंपरी, ता. २ : प्रॉपर्टीच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाला दगडाने, लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना देहूरोड येथे घडली. बाबू लक्ष्मण नायडू (वय ४५, रा. किवळे) असे या घटनेतील जखमीचे नाव आहे. त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करिअप्पा नागराज नायडू, शंकर नागराज नायडू, तिमप्पा गोविंदअप्पा नायडू, रंगा शंकर नायडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी बाबू हे रिक्षा चालक आहेत. रविवारी (ता.३०) दुपारी ते रिक्षाचे काम संपवून सवाना चौक येथे चहा पित होते. त्यावेळी आरोपी करिअप्पा तिथे आला. त्याने प्रॉपर्टीच्या वादातून बाबू यांच्यासोबत वाद करून त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर बाबू तिथून पळून शंकर मंदिराच्या मागे आले. त्यावेळी सर्व आरोपींनी बाबू यांना दगडाने, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपी करिअप्पा याने लोखंडी रॉडने मारून जखमी केले. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चऱ्होलीत एकावर प्राणघातक हल्ला
मासेविक्रीची गाडी लावल्याच्या कारणावरून वाद घालत एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना चऱ्होली येथे घडली. या प्रकरणी सीमा संदीप जाधव (रा. चऱ्होली) फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनंजय ऊर्फ धनाजी चंद्रकांत तापकीर, चंद्रकांत वामन तापकीर, सचिन इंद्रदेव चौहान यांना अटक केली असून तानाजी तापकीर याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी या त्यांचे पती संदीप शंकर जाधव (वय ३८) यांच्यासह आझादनगर चौक येथे मासे विक्रीची गाडी लावतात. सोमवारी सायंकाळी तेथे आलेले आरोपी तानाजी व धनंजय यांनी येथे कोणाच्या परवानगीने गाडी लावली असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. जाधव दाम्पत्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. संदीप जाधव यांच्यावर कोयत्याने वार करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. इतर आरोपींनीही त्यांना मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथे वाद सोडविण्यासाठी आलेला फिर्यादी यांचा भाचा सागर माने यालाही बेदम मारहाण केली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

निगडीतील ‘आयटीआय’मध्ये चोरी
खिडकीचे गज कापून आत शिरलेल्या चोरट्याने ऐवज लंपास केला. हा प्रकार निगडीतील आयटीआय प्रशिक्षण संस्थेत घडला. या प्रकरणी अशोक शरणप्पा मोरे (रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. निगडीतील दुर्गा चौकातील आयटीआय शिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमधील टेरेसच्या खिडकीचे गज कापून चोरटा आत शिरला. गरम, थंड पाण्याचे मिक्सर, वॉश बेसिन, तांब्याची वेल्डिंग केबल, गॅस वेल्डिंग मशिन असा एकूण ३१ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई मारुंजी येथे करण्यात आली. शुभम तानाजी चव्हाण (वय २६, कासारसाई), अजय गुरप्पा नाटेकर (वय १९, जाधव वस्ती, मारुंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चव्हाण याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजारांचे पिस्तूल व नाटेकर याची घरझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजारांचे पिस्तूल सापडले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड; रुळावर लोकलच्या रांगा, व्हिडिओ व्हायरल

Mumbai News : सीएसएमटीत चुकीच्या सिग्नलचा गोंधळ; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, स्थानकप्रमुख निलंबित

IPL 2026, SRH vs DC: पॅट कमिन्सचं पुनरागमन नाहीच! हैदराबाद-दिल्ली संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र मोठे बदल

Baramati By Election : सुनेत्रावहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update : गुजरात महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू - खासदार संजय सिंह

SCROLL FOR NEXT