पुणे

ऑनलाइन बेटिंग करणाऱ्याला खडकीतून अटक

CD

पुणे, ता. २४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग करणाऱ्याला पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने खडकी येथून अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुनीत चंदनमल जैन (वय ३६, रा. मेहता टॉवर्स, खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमासह भारतीय टेलिग्राफ ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे एकदिवसीय क्रिकेट सामाना सुरु आहे. या स्पर्धेतील एका सामन्यासाठी खडकी येथील पुनीत जैन हा मोबाइलद्वारे लोटस, क्रिकेट बझ या क्रिकेट बेटिंग मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खडकी येथे क्रिकेट स्टेडियममधील बुकीकडुन बेकायदेशीररीत्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाइन बेटिंग घेत असताना आढळल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम, १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, शोभा क्षीरसागर, श्रीधर खडके, श्रीकांत चव्हाण, अण्णा माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : भांडुपमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा 19 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT