पुणे

परीक्षार्थींकडून चार कोटी घेणारे दोघे गजाआड

CD

पुणे, ता. ६ : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडवून आणलेले रॅकेट उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक केली आहे. दोघांनी ३५० परीक्षार्थींकडून तीन कोटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याचे तपासात समोर आले आहे.
सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींना प्रथमवर्ग न्यायलयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप (वय ४८, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय ४५, रा. लातूर) यांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेले तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर, प्रीतिश देशमुख, अंकुश हरकळ, संतोष हरकळ, अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली असून चार कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी अटक आरोपी घोलप आणि डोंगरे यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुरुवारी (ता. ६) न्यायालयात हजर केले. आरोपी घोलप याचे तुकाराम सुपे आणि डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याबरोबर मोबाईलवर चॅटिंग झाल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपी घोलप हा सुपेकर याचा चालक असल्याने त्याने अनेक परिक्षार्थींकडून पैसे उकळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत तपास सुरू आहे. आरोपी डोंगरे याने प्रीतिश देशमुख याच्याकडून रक्कम स्वीकारली असून ती कोणासाठी स्वीकारली याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला.


सुरंजित पाटीलने काय केले
पाटील याने २०१९ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेला बसलेल्या २०० परिक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये घेतले. या परीक्षार्थींची यादी व दोन कोटी ३५ लाख रूपयाची रक्कम जमवली.

स्वप्नील पाटीलने काय केले
स्वप्नील पाटील याने देखील २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेतील १५० परिक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये घेतले. त्याने एकूण एक कोटी ५० लाख रुपये जमा केले.

संतोष आणि अंकुश हरकळला दिली रक्कम
दोघांनी ३५० परिक्षार्थींचे तीन कोटी ८५
लाख रुपये आरोपी संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना दिल्याचे कबूल केले आहे. सुरंजित आणि स्वप्नील यांनी संतोष आणि अंकुश हरकळ यांच्याशी संपर्क साधला. तसेच, टीईटी परिक्षा आणि २०१९ बसलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी नियोजित कट रचला आहे, असे ॲड. जाधव यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT