पुणे

म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी आज सोडत

CD

पुणे, ता. ६ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत २ हजार ८२३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एक हजार ३९९ सदनिका अशा एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.

म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. या चार हजार २२२ सदनिकांसाठी ८० हजार ८४८ अर्जदारांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी ६५ हजार १८० अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीमध्ये सहभाग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

सोडतीचा कार्यक्रम महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, पुणे खंडपीठाचे न्यायिक सदस्य एम. एम. पोतदार, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.
कोरोनामुळे जिल्हा परिषदेत केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सर्व अर्जदारांना फेसबुक लाइव्ह व यूट्यूब लाइव्हची लिंक पाठवण्यात येणार असून, लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन सोडतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT