पुणे

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

CD

पुणे, ता. ६ ः शहरामध्ये कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांनीही आता मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मास्क परिधान न करणाऱ्या सुमारे दीड हजार जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

मागील काही दिवसांतच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तरीही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी, खासगी, सरकारी कार्यालयांमध्ये, बाजारपेठांत मास्कचा वापर होत नसल्याची स्थिती आहे. नागरिकांमध्ये अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य नसल्यामुळे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बुधवारपासून कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारपासून शहरात मास्कची कारवाई सुरू करण्यात आली. तर बुधवारी सकाळपासूनच शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा अशा ठिकाणी पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून आले.

बुधवारी दिवसभरात शहरात मास्क न घालणाऱ्या ३९१ जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी मास्कचा वापर न करणाऱ्या अकराशेहून अधिक नागरिक पोलिसांना आढळून आले. या वेळी प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिस कारवाई करीत असल्याचे पाहून भितीपोटी नागरिकांकडून मास्क घातले जात होते. तर काहीजण कारवाई टाळण्यासाठी वेगळ्या वाटेने पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

नागरिकांना मास्क वापरण्याबाबत वारंवार आवाहन केले होते. आता दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT