पुणे

पुणे शहरात बाविसशे कोरोना रुग्ण

CD

पुणे, ता. ६ ः पुणे शहरात गुरुवारी (ता. ६) एकाच दिवसात २ हजार २८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात शहरातील केवळ ८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील दिवसातील नवीन रुग्णांची संख्या ही ३ हजार ६४८ इतकी आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसात चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील तीन आणि पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असली पुणेकरांनी घाबरून न जाता अधिकाधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यातील दिवसातील नवीन रुग्णांमध्ये बुधवारच्या (ता. ५) तुलनेत गुरुवारी (ता. ६) पावणे पाचशेनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात नवीन रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण खूपच अल्प असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारी अहवालात दिसून आले आहे.
जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार २८४ रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील ८१७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६९, नगरपालिका हद्दीतील ६६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ११२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसात पुणे शहरातील ८० जणांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील २२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २७, नगरपालिका हद्दीतील ८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३३ जण आहेत.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण ११ हजार ६७५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विवध रुग्णालयांमध्ये ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित १० हजार ७७० जण हे गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT