पुणे

मॅट्रीमोनियल साईटवरून २५५ तरूणींची फसवणूक प्रकरणी दोघे अटक

CD

पिंपरी, ता. २५ : केंद्र सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवून मॅट्रीमोनियल साईटवरून बनावट नावाने तरुणींना लग्नाचे आमिष दाखवायचे. त्यानंतर तरुणींकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी बंगलोर येथून अटक केली. या दोघांनी मॅट्रीमोनियल साईटवरून पुणे, बंगलोर व गुरगाव येथील तब्बल २५५ तरुणींशी संपर्क साधून फसवणूक केल्याचे व काही तरुणींचे शारीरिक शोषण केल्याचे समोर आले, अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निशांत रमेशचंद नंदवाना (वय ३३) व विशाल हर्षद शर्मा (वय ३३, दोघे रा. मुळ -राजस्थान, सध्य -बंगलोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
निशांत हा केंद्र सरकारच्या पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये चीफ प्रोजेक्ट मॅनेजर असल्याची तर, विशाल हा केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल हौसिंग अँड अर्बन अ‍ॅग्रिकल्चर मिनिस्ट्रीचा डेप्युटी डायरेक्टर असल्याचे खोटे सांगायचा. दोघांनी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन तरूणींसमवेत जीवनसाथी या मॅट्रीमोनियल साईटवरून ओळख निर्माण केली. निशांतने आपले नाव अधितांश अग्निहोत्री तर विशालने अश्विक शुक्ला हे बनावट नाव वापरले. आलिशान मोटारीतून येऊन तरुणींना फिरायला नेऊन लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर एकाने तरुणीकडून एका प्रोजेक्टसाठी १३ लाख रुपये घेतले. तर, दुसऱ्याने व्यवसायासाठी तरुणीकडून पाच लाख रुपये घेतले. तसेच जीपमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोघेही मोबाईल बंद करून पुण्यातून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे दोन्ही तरुणींच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
आरोपींनी इतरही तरुणींना फसविले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. दोघे आरोपी बंगलोर येथे उच्चभ्रू वसाहतीत बनावट नावाने राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तेरा महागडे मोबाईल, बनावट नावाची ओळखपत्रे, दोन मोटारी, रोकड असा ७५ लाखांचा ऐवज जप्त केला. त्यांच्यावर गुरगाव येथे दोन, बंगलोर येथे तीन तर पुण्यात एक गुन्हा दाखल आहे. या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सव्वा ते दीड कोटी रुपये उकळल्याची शक्यता
तपासात दोन्ही आरोपींनी पुण्यातील ९१, बंगलोर येथील १४२ तर गुरगाव येथील २२ अशा तब्बल २५५ तरुणींशी मॅट्रीमोनियल साईटवरून संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्यांनी आतापर्यंत या माध्यमातून सव्वा ते दीड कोटी रुपये उकळल्याची शक्यता आहे.

ही वापरली बनावट नावे
आरोपी निशांत याने पुण्यात अधितांश अग्निहोत्री, बंगलोरमध्ये अभव कश्यप तर गुरगाव येथे आधव अग्निहोत्री ही बनावट नावे वापरली. तर विशाल शर्मा याने पुण्यात अश्विक शुक्ला, बंगलोरमध्ये अथर्वन तिवारी व गुरगाव येथे अव्याग्र्ह शुक्ला, रुद्रांश शर्मा, देवांश शर्मा, अचैत्य शर्मा ही बनावट नावे वापरून मोबाईल क्रमांकही वेगवेगळे वापरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT