पुणे

प्राचीन वस्तू संकलन मोहिमेला मोठा प्रतिसाद

CD

पुणे, ता. १० ः देवादिकांच्या धातू, ‘पीओपी’च्या मूर्ती, पुतळे, देव्हारे, छाप, टाक, तसबिरी, जुन्या पोथ्या, धार्मिक ग्रंथ आदी वस्तूंच्या संकलनाला नुकताच मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात सुमारे पाच टन सामान जमा झाले.

नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी गेल्यावर्षी जुलै आणि ऑक्टोबरमध्ये ही मोहीम आयोजित केली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही मोहीम झाली. यात लोकांनी दत्तवाडी, टिळक रोड, धनकवडी, बावधन, पाषाण, कोथरूड, भुसारी कॉलनी, भूगाव, कर्वेनगर, वारजे, धायरी, वडगाव बुद्रुक, सनसिटी, सहकारनगर, बिबवेवाडी, पद्मावती, चिखली प्राधिकरण (चिंचवड), मुंढवा, यासह बार्शी व सोलापूरहून येऊनही लोकांनी सामान दिले.

देवदेवतांसंबंधित गोष्टी कुठे द्याव्यात? ही समस्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावते आहे, हे लक्षात घेऊन ही मोहीम आयोजित केली. त्यासाठी नाशिकच्या ‘संपूर्णम्’ संस्थेच्या सहकार्याने सहस्रबुद्धे यांनी या मोहिमेची सुरुवात केली. संपूर्णमच्या अॅड. तृप्ती गायकवाड यांनी या उपक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. माधवी केसकर, आशा होनवाड, मुकुंद गोरे, प्रज्ञा गोवईकर, प्रभा नेने, दीपाली बोरा, तृप्ती कुलकर्णी, वर्षा बरिदे, दामोदर पडवळ व रमण शहापुरे यांनी मोहिमेत भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT