पुणे

परवाना देण्याच्या बहाण्याने साठ लाख रुपयांची फसवणूक

CD

पुणे, ता. १० : उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून, दारुच्या दुकानाचा परवाना देण्याचा बहाण्याने व्यावसायिकाची साठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रणजित अरविंद लोहार (रा.माळीनगर, माळशिरस, सोलापूर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम दुर्गेश गौर व त्याची पत्नी रंजना गौर ऊर्फ रंजना उपदेशे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्धही यापूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोघांनाही यापुर्वीच शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांनीच लोहार यांना फसविल्याची माहिती पुढे आली आहे.

रंजना गौरने आपला पती शुभम हा उत्पादन शुल्क विभागात सहायक आयुक्त असल्याचे सांगून ओळख करून दिली होती. त्यावेळी शुभम याने बनावट ओळखपत्र दाखविल्याने लोहार यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर त्यांना दाम्पत्याने दारू विक्री करण्यासाठी आवश्‍यक परवाना मिळवून देऊ, असे सांगितले. त्यानंतर मार्च २०२० पासून आत्तापर्यंत लोहार यांच्याकडून साठ लाख रुपये उकळले व परवान्याची बनावट कागदपत्रे दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT