पुणे

अंदाजपत्रकासाठी मुदतवाढीचा आयुक्तांचा स्थायीसमोर प्रस्ताव

CD

पुणे, ता. १० ः पुणे महापालिकेचे आगामी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना उशीर लागणार आहे. निवडणुकीच्या कामामुळे १५ जानेवारी ऐवजी २२ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसुली, भांडवली उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (अ व क) अंदाजपत्रक १५ जानेवारी किंवा त्यापूर्वी स्थायी समितीमध्ये सादर होणे आवश्‍यक असते. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यांच्या योजनांचा त्यामध्ये समावेश करून अंदाजपत्रकात बदल करतात व हे अंदाजपत्रक मुख्य सभेत चर्चेसाठी सादर केले जाते. मुख्यसभेत हे अंदाजपत्रक ३१ मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्‍यक असते. महापालिकेच्या यापूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार २० मार्च पर्यंत पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर केले जाते.
महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रत्येक विभागाकडून माहिती मागवली आहे. १५ जानेवारीपर्यंत हे अंदाजपत्रक सादर होणे अपेक्षीत होते. पण महापालिका निवडणुकीच्या कामकाजामुळे वेळ वाढवून मागितला आहे. २२ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता अंदाजपत्रक सादर करण्याची परवानगी मागितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT