पुणे

सोन्यावरील मुद्रांक शुक्कासाठी समिती

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० : राज्यात आयात होणाऱ्या सोने-चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून समिती नेमली आहे. हे शुल्क माफ अथवा कमी केल्यास राज्याच्या महसुलावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सर्वकष अभ्यास करून ही समिती शिफारस करणार आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव असणार आहे. तर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव, राज्यकर आयुक्त हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तर सदस्य सचिव म्हणून नोंदणी महानिरीक्षक हे काम पाहणार आहे. महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांमध्ये आयात होणाऱ्या सोने-चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवरील मुद्रांक शुल्क रचनेची तुलना करणे. हे शुल्क माफ अथवा कमी केल्यास सोने-चांदीच्या उद्योग क्षेत्रावर व राज्याच्या महसुलावर होणारा संभाव्य परिणामांचा सर्वंकष अभ्यास करून ही समिती शासनास शिफारशी करणार आहे. या समितीने हा अहवाल एक महिन्यात सादर करावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

Bhiwandi Minor Assault Case : भिवंडीत संतापजनक घटना! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपीने फ्लॅटमध्ये बोलावले अन्...

Tukaram Mundhe: विधानसभेत मोठी घोषणा; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली नाही, भेसळ माफियांना धक्का!

Nashik Tourism : नाशिकच्या 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रील बनवण्यास आणि सेल्फी घेण्यास बंदी! उल्लंघन केल्यास कारवाई; हरिहरगडावर दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश

Pune PWD: पुणे ‘पीडब्ल्यूडी’चा कारभार रामभरोसे! मुख्य अभियंत्याअभावी कर्मचाऱ्यांच्या मुंबईच्या फेऱ्या,अडीच महिन्यांपासून मुख्य अभियंता नाही

SCROLL FOR NEXT