पुणे

अवती भवती

CD

फिटनेस क्लबद्वारे महिलांना मार्गदर्शन
पुणे ः सदाशिव पेठेत थ्री एस फिटनेस क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून वकील, आर्किटेक्ट, सनदी लेखापाल, डॉक्टर, व्यावसायिक आदी क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. महिलांच्या एकसंघ शक्तीने अनेक कौटुंबिक व व्यावसायिक समस्यांचे निराकरण होत आहे, अशी माहिती संस्थापिका सुप्रिया ढुमे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘पीसीओडी, वाढते वजन, गर्भावस्था, मानसिक ताणतणाव आदीसंबंधी या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळते. दिवसातून एकदा एकत्र येत शारीरिक व्यायाम, योगासने, आदी उपक्रम राबविण्यात येतात.’’

सुतार महासंघातर्फे ‘समाजभूषण’चे वितरण
पुणे ः अखिल महाराष्ट्र विश्‍वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सर्पदंश तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, मृदंगाचार्य अशोक पांचाळ, गोपीनाथ दवेकर, धुळे महापालिकेचे माजी महापौर के. डी. मिस्री, गजानन वानखेडे, दगडू काळे आदींना या पुरस्काराने सन्मानित केले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात नुकत्याच आयोजित कार्यक्रमात नगरसेवक योगेश ससाणे, ओबीसी महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी, विराट विश्‍वकर्मा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत प्रदान केला. यावेळी मोफत लसीकरण आणि आरोग्य शिबिराचे आयोजनही केले होते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हनुमंत पांचाळ यांनी दिली. पुणे शहरामध्ये विद्यार्थी वसतीगृह आणि समाज मंदिर उभारण्यासाठी महासंघातर्फे पाठपुरावा करण्यात येईल, असेही पांचाळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT