पुणे

देहू ः आरक्षण सोडत

CD

अनुसूचित जाती महिलेसाठी
देहूचे नगराध्यक्षपद राखीव

देहू, ता. २७ ः राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २७ ) जाहीर झाली. यात नव्याने स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव आहे.
देहू नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. प्रशांत जाधव यांनी सांगितले, की आरक्षण सोडतीमध्ये देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे.
देहू नगरपंचायतीमध्ये १७ सदस्य आहे. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १४ सदस्य निवडून आले आहेत. तर दोन अपक्ष आणि एक भारतीय जनता पक्षाचा असे एकूण १७ सदस्य आहेत. सतरा प्रभागापैकी दोन प्रभाग अनुसूचित महिलांसाठी राखीव होते. यात प्रभाग क्रमांक तीनमध्ये पूजा दिवटे आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये स्मिता चव्हाण या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर दिवटे अथवा चव्हाण यापैकी कोणाची वर्णी लागते, याबाबत देहूकरांमध्ये उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT