पुणे

कोरोनाच्‍या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज विभागीय आयुक्त सौरभ राव ः प्रतिबंधात्मक उपापयोजनांवर अधिक भर

CD

पुणे, ता. ८ ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी विभागीय प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात जंबो कोविड सेंटर आणि आयसोलेशन कक्षांची उभारणी करत असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे विभागात सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, यावर वेळीच प्रभावी उपाययोजना करता याव्यात, यासाठी सौरभ राव यांनी शनिवारी (ता.८) सर्व सरकारी अधिकारी, प्रख्यात डॉक्टर आणि उद्योजकांची घेतली. त्या बैठकीत सौरभ राव बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता, डॉ. धनंजय केळकर, डॉ. पुर्वेझ ग्रांट आदींसह राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदा, महापालिकांचे आरोग्‍य अधिकारी उपस्थित होते. ओमिक्रॉन या व्हेरियंटचा प्रसार हा पुढील काही आठवडे राहील. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील, याबाबत सूचना करण्याचा आदेशही राव यांनी सरकारी अधिकारी आणि डॉक्टरांना दिला.
राव म्हणाले, ‘‘सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही यामध्ये कोकण आणि पुणे विभागात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. पुणे विभागातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये एकट्या पुणे जिल्ह्यातील २२ टक्के रुग्ण आहेत. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियमितपणे उच्चस्तरीय बैठका घेत आहोत. सुदैवाने निर्धारित उपचार, प्रोटोकॉल, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या यामुळे तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी अधिक चांगले तयार आहोत. भूतकाळातील अनुभव आणि अधिक जागरूकतेमुळे कुटुंबातील सदस्यांचा आणि काळजी घेणाऱ्यांचा आत्मविश्वास देखील उच्च पातळीवर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून पायाभूत सुविधांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे.’’

डॉ. धनंजय केळकर म्हणाले, ‘‘विलगीकरण केंद्रे (उदा. गरवारे महाविद्यालय, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आदी) त्वरित पुन्हा सुरू करणे आवश्‍यक आहे. विवाह आणि सामाजिक कार्यक्रम आणि शाळा व महाविद्यालयांमधील अनावश्यक मेळावे बंद करावेत. गेल्या काही दिवसात दीनानाथ रुग्णालयातील ३२ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दीनानाथ रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या माहितीनुसार लसीकरणामुळे ओमिक्रॉनपासून संरक्षण होत नसल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ७८ रुग्णांपैकी ६७ रुग्णांचे दोन्ही कोरोना डोस पूर्ण झाले असल्याचे दिसून आले आहे.’’

डॉ. पुर्वेझ ग्रँट म्हणाले, ‘‘नोव्हॉवॅक्स ही नवीनतम लस ही कोविशील्डचे दोन डोस घेतलेल्या सर्वांना देण्याची गरज आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणे इतकी सौम्य आहेत की, हिंजवडी व पुणे येथील रूबी हॉल रुग्णालयात कोणालाही व्हेंटिलेटरची आवश्यकता अद्याप लागलेली नाही. भारतात जानेवारी २०२२ च्या अखेरीस ओमिक्रॉनचे १० लाख रुग्ण आढळतील.’’

बैठकीत सुचविलेल्या उपाययोजना

प्रसार मर्यादित करून संसर्गाची संख्या कमी करणे अनिवार्य
लग्न, सामाजिक कार्यक्रम, रेस्टॉरंटमधील गर्दी कमी करणे आवश्‍यक
आर्थिक बाबींचा समतोल राखून गर्दी कमी करणे महत्त्वाचे
प्रत्येक नागरिकाने चांगली मुखपट्टी (मास्क) घालणे बंधनकारक करावे
मॉल्समधील भोजनालये बंद केली पाहिजेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT