पुणे

जिल्ह्यात दिवसभरात ४३४८ कोरोना रुग्ण

CD

पुणे, ता. ८ ः पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. ८) दिवसभरात चार हजार ३४८ नवे कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यात दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील दोन हजार ४७१ जण आहेत. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हे दोन्ही कोरोना मृत्यू पुणे शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही १८ हजार ८५७ झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अन्य १७ हजार ५३१ जण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील एक हजार ७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७८, नगरपालिका हद्दीतील १५१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७५ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, दिवसभरात ८६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील कोरोनामुक्तांत पुणे शहरातील ७११, पिंपरी-चिंचवडमधील ४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७२, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २८ जण आहेत. दिवसभरात एकूण ३४ हजार ५२४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये पुणे शहरातील १९ हजार १८६ चाचण्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT