पुणे

पीएमपीमधून एक लाखाचे गंठण लंपास

CD

पुणे, ता. ९ ः पीएमपी बसमधील चोरीच्या घटनांनी प्रवासी त्रस्त असताना बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सहकारनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी धनकवडी येथील ६४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राव नर्सिंग होम ते बालाजीनगर दरम्यान पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी फिर्यादीच्या पर्समधून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरले. फिर्यादी बालाजीनगर येथील अहिल्यादेवी चौक येथे उतरल्या. त्यावेळी त्यांना पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मागील काही दिवसांपासून शहरात बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पर्समधील दागिने, पैसे, मोबाईल, हातातील सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील सोन्याची साखळी असे दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. मात्र अजूनही पोलिसांना चोरट्यांना बेड्या ठोकता आलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT