पुणे

‘रमाई महोत्सवा’चे बुधवारपासून आयोजन

CD

पुणे, ता. २८ ः महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून देशातील लोकसहभागातील ‘रमाई महोत्सवाचे’ आयोजन महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती व आडकर फाउंडेशनतर्फे केले आहे. दोन ते सात फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यात रमामाईंच्या स्मृतींना व विचारांना उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आणि समाजमाध्यम प्रमुख अभिजित जाधव उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, ‘‘या महोत्सवामध्ये विविध लोकप्रबोधनपर कार्यक्रम, कविसंमेलन, रमाईरत्न पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विश्‍वजीत कदम, पुणे महापालिकेच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित राहणार आहेत.’’

ॲड. आडकर म्हणाले, ‘‘सहा दिवसांचा हा महोत्सव भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेजसमोर दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होईल. महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता. २) होणार असून, रामजीबाबा आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कारा’चे आयोजन केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT