पुणे

पाच टक्केच रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात

CD

पुणे, ता. ९ ः कोरोना बाधितांपैकी फार थोड्या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज पडत आहे. जवळजवळ ९५ टक्के रुग्ण हे घरातच विलगीकरणामध्ये उपचार घेत आहे. शहरातील रुग्ण संख्येत रविवारी चार हजार २९ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरात आता १४ हजार ८९० सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी फक्त ५.४८ टक्के रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. रविवारी दिवसभरात ६८८ रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे देशात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातही कोरोना निदान चाचण्यांनी वेग घेतला आहे. रविवारी शहरात १८ हजार १२ कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार हजार २९ रुग्ण बाधित सापडले आहे. संक्रमणाचा दर जरी जास्त असला तरी गंभीर आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. बहुतेकांना सौम्य लक्षणे दिसत आहे. दाट लोकवस्ती, लहान घरे असलेल्या झोपडपट्टीच्या भागात कोरोनाच्या संक्रमणाचा धोका असला तरी प्रत्यक्षात या भागापेक्षा सोसायट्यांमध्येच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड या भागातच बहुतांश रुग्ण असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिका हद्दीत आज ४ हजार ०२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकूण १४ हजार ८९० सक्रिय रुग्णांपैकी केवळ ५.४८ टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

आकडे बोलता...
- शहरात उपलब्ध (रिक्त) व्हेंटिलेटर ः ५२६
- शहरातील उपलब्ध (रिक्त) ऑक्सिजन खाटा ः ३,९३८
- ऑक्सिजनवर असलेले रुग्ण ः १३४
- इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवरील रुग्ण ः १६
- नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरील रुग्ण ः २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT