पुणे

उच्चशिक्षित महिलेच्या फसवणुकप्रकरणी गुन्हा

CD

पुणे, ता. ११ ः डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या व्यक्तीने उच्चशिक्षित महिलेस डॉक्‍टर असल्याची बतावणी करून, परदेशी चलन सीमाशुल्क विभागाकडून सोडविण्याचे कारण सांगत सात लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वडगाव शेरी येथील ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अजय नाथन व इतर पाच जणांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून ते ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली. आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये समाजमाध्यमाद्वारे चॅटिंग सुरू झाल्यानंतर आरोपीने महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तो लग्न करण्यासाठी दोन लाख अमेरिकन डॉलर घेऊन दिल्ली येथे आला असल्याचे त्याने महिलेस सांगितले. परंतु, परदेशी चलन असल्याने त्यास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडविले असून चेक क्लिअर करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने महिलेस सांगितले. त्यानुसार, महिलेने त्यास काही पैसे पाठविले. त्यानंतर त्याने विविध कारणे सांगून महिलेकडून सात लाख आठ हजार रुपये घेतले. महिलेस आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी प्रारंभी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अशी घ्या काळजी
- अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नका
- फेसबुकवर अनोळखी व्यक्तींच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारू नका
- समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री वाढविताना पुरेशी काळजी घ्या
- परिचित नसलेल्यांशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संवाद साधू नका
- सोशल मीडियावर वैयक्तिक व गोपनीय माहिती ठेवण्याचे टाळा
- वैयक्तिक, कुटुंबांचे व्हीडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर ठेवू नका
- चुकीचे घडत असल्यास कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी किंवा पोलिसांशी संवाद साधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT