पुणे

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयांच्या घरातुन मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त

CD

पुणे, ता. ११ ः जळगावमधील शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संचालकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या पथकाने जळगाव येथे महाजन यांच्या निकटवर्तीयांच्या घराची झडती घेतली. पोलिसांनी यात मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर, जळगाव) यांच्यासह २९ जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ॲड. विजय पाटील (वय ५२) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जानेवारी २०२१ मध्ये याप्रकरणी फिर्याद दिली होती. जळगावमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेचे ॲड. विजय पाटील संचालक आहेत. संबंधित संस्था भाजपचे गिरीश महाजन यांना पाहिजे होती. त्यासाठी महाजन यांनी ॲड. पाटील यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. परंतु पाटील यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे आरोपींनी त्यांना पुण्यात बोलावून सदाशिव पेठेतील एका सदनिकेमध्ये डांबून ठेवून मारहाण केली होती. तसेच ॲड. पाटील यांनी संस्थेच्या सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाहीत, तर त्यांना ‘एमपीडीए’च्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या एका पथकाने रविवारी जळगाव येथे या प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरांमध्ये झडती घेतली. दोन दिवस झडती घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. झडती घेतलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांशजण गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ४० जणांचे पथक जळगावला गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT