पुणे

तरुणाईच बनवेल देशाला विश्वगुरू

CD

पुणे, ता. ११ ः ‘उठा, जागे व्हा, ध्येयप्रातीशिवाय थांबू नका’ अशी हाक देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज जयंती, म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन. कर्तृत्ववान तरुणाईच देशाला विश्वगुरू बनवेल अशी भावना युवकांमधून युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.
रोहित राऊत म्हणतो, ‘‘स्वामी विवेकानंद यांनी या देशाला जागतिक व्यासपीठावर वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. प्रत्येक तरुणांच्या मनात देशासाठी फक्त प्राणाची आहुती देणे हा विचार नसेल तर या देशासाठी जगणं हा विचार असेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने युवादिन साजरा होईल. भारत पुन्हा विश्वगुरू बनेल आणि प्रत्येक क्षेत्रात भारत अग्रेसर असेल. भारताचे नेतृत्व हे संपूर्ण विश्व स्वीकारेल तेव्हा खऱ्या अर्थाने ‘युवा दिन’ साजरा होईल; पण हे होण्यासाठी तरुणाईला कर्तृत्व सिद्ध करावे लागेल.’’
गणेश पाडेकर म्हणाला, ‘‘तरुणांना योग्य ते योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उद्याचा तरुण देशाचा सक्षम नागरिक म्हणून नक्कीच ओळखला जाईल. युवा या शब्दातच खूप ताकद आणि प्रेरणा आहे. युवकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात संपूर्ण योगदान द्यावे. ते देशाबरोबरच समाजासाठीही समर्पण असेल. ‘युवा नेता’ नव्हे तर युवाशक्तीचे नेतृत्व करणारा ‘युवा मित्र’ बनावे असे मला वाटते.’’
प्रथमेश रत्नपारखी म्हणाला, ‘‘युवादिन केवळ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पुजनापुरता मर्यादित नसावा. राष्ट्रभक्तीच्या विचारांचा संचार असणारा दिन म्हणून तो पाळावा. जगात सर्वाधिक युवकांची लोकसंख्या आपल्या देशात आहे. युवा वर्गाची समाजप्रती सकारात्मक कार्यासाठी सक्रियता देखील तितकीच असावी.’’
ऋतुजा कदम म्हणते, ‘‘राष्ट्राचे आणि देशाचं भवितव्य आणि सर्वस्व म्हणजे युवक. मात्र तो तसा राहिलाय का? आजचा युवक भारतीय संस्कृती विसरूनच गेलाय. आजचा युवक भ्रमित अवस्थेत जगत आहे. युवकांमधील बौद्धिक आणि आत्मिक जागृतीवरच देशाची प्रगती अवलंबून आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT