पुणे

‘वृक्षतोडीसाठी सरकारच्या नियमांना हरताळ’

CD

पुणे, ता. १२ : दोनशेच्या वर आणि पाच वर्ष वयोमानावरील वृक्षांची तोड करायची असेल, तर त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे असतानादेखील महापालिकेच्या धनकवडी आणि नगर रस्ता-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून जवळपास सातशेहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. त्यामुळे हा राज्य सरकारच्या आदेशाचा भंग असून, वृक्ष प्राधिकरणाने त्यास मंजुरी देऊ नये, अशी मागणी नंदकुमार मंडोरा आणि किशोर रजपूत यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दोनशेपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या वृक्षांची तोड करायची असेल, तर त्यास राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. सरकारचे असे आदेश असतानाही नगर रस्ता-वडगाव शेरी कार्यालयाने ४९३ वृक्ष तोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे, तर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने २१५ वृक्ष काढण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या दोन्ही प्रस्तावातील पन्नास टक्क्याहून अधिक वृक्ष हे पाच वर्ष आयुर्मानावरील आहेत. त्यामुळे ती तोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. ती न घेता हे प्रस्ताव मंजूर केल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे आयुक्तांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT