पुणे

कर्तव्यपूर्तीचा भारही पेलू शकत नाही, तेव्हा...

CD

‘‘दोन वर्षांपूर्वी कोरोना येण्याआधी मला हृदयविकारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, त्यात मला अनेकांनी मदत केली. काहींनी प्रेमाने माझ्या तब्येतीची चौकशी केली. आशीर्वाद दिले. सदिच्छा दिल्या. त्यातले प्रमुख बारा लोक आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी हे माझे मी कर्तव्य समजतो. माझी विद्यार्थिनी अपर्णा आपटे ही नावे वाचेल. कोणी-कोणी मदत केली, त्यांची माहिती सांगेल. त्यांनी कृपया येथे येऊन माझ्याकडून छोटी भेट घ्यावी, अशी माझी इच्छा आहे,’’ हे प्रकट मनोगत रविवारी ज्येष्ठ व्हायोलिनवादक आणि गुरू पं. भालचंद्र देव यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी सकाळी त्यांनीच आयोजित केलेल्या आनंद सोहळ्यात व्यक्त केली.

यामध्ये पत्नी नीला देव, मुलगा किशोर देव, कन्या चारुशीला गोसावी, जावई राजय गोसावी, नातू रविराज गोसावी यांच्यासह मुक्त पत्रकार सुभाष इनामदार, रोहिणी होनप, पराग हुरस्वार, सचिन काळे, डॉ. कस्तुरी कुलकर्णी-वाळिंबे यांना भेटवस्तू दिल्या. त्यांचे स्नेही एस. के. देशपांडे यांचे नाव घेताच.

भालचंद्र देव हे अचानक खुर्चीवर अस्वस्थ झाले. मान टाकली. सारे उपस्थित धावले, त्यांना हाका मारल्या. पाणी दिले, शिंपडले; पण काहीच प्रतिसाद दिला नाही. तत्काळ देव यांना दीनानाथ रुग्णालयात नेले. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर तत्काळ उपचार केले गेले. तीन तासांच्या उपचारानंतर त्यांना आपत्कालीन दालनात बेड उपलब्ध नसल्याने संजीवनी रुग्णालयात दाखल केले. ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तींना स्नेहभेट देताना बहुधा ते भारावले असावेत, तोच भार त्यांचे कमकुवत झालेले हृदय पेलू शकले नाही. अन् त्यातच बाह्य उपचाराला प्रतिसाद न देताच मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास या कर्मयोगी ज्येष्ठ व्हायोलिनवादकाने अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्यावर मंगळवारी एक वाजून पंधरा मिनिटांनी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देताना सारेच भावुक झाले होते.

दोन वर्षांपूर्वी त्यांना असाच हृदयविकाराचा आघात झाला होता. त्यातून ते पूर्ण सावरले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे हृदय केवळ ३० टक्के काम करीत असल्याचे सांगितले होते. पण, तीव्र इच्छाशक्ती आणि वेळेवर औषधामुळे ते हिंडत फिरत होते. व्हायोलिनच्या शिकवण्याही घरी घेत होते. पण, रविवारी त्यांच्या आग्रहाखातर हा आनंद सोहळा साजरा केला होता. पण, त्यात हे अघटित घडल्याने सारे उपस्थित निःशब्द झाले. यातून नक्कीच काही उत्तम होईल, अशी आशा होती. मात्र, तोच त्यांचा अखेर ठरला. इच्छा मरण मागून घेतल्यासारखे हे घडले, डोळ्यांसमोर! याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा.

तोच क्षण साजरा करण्यासाठी ते जगत होते असे वाटले. कोरोनामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ दूर जात होती. परंतु, ती संधी आली, तेव्हा पं. भालचंद्र देव यांनी ती घेतली अन् ते आपल्यातून इतिकर्तव्यता करून निघून गेले. हा धक्का त्यांच्या कुटुंबीयांवर तर आहेच, पण जवळच्या सर्वांना बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT