पुणे

एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना देणार भगवद्‍गीता प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची घोषणा; स्वामी विवेकानंद जयंती साजरी

CD

पुणे, ता. १२ ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भगवद्‍गीतेच्या सव्वालाख प्रतींचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे, अशी घोषणा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली. एमआयटीतर्फे स्वामी विवेकानंद यांची १५९ वी जयंती विद्यापीठात साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ‘‘स्वामी विवेकांनदांनी जगाला भारताची ओळख करून दिली. ते दूरदृष्टी आणि वाचासिद्धी असलेले युगपुरुष होते. धर्म, प्रार्थना आणि ज्ञान याबद्दलचे विवेचन योग्य प्रकारे विवेकानंदांनी जगासमोर मांडले. प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यायला हवा,’’ असे मत डॉ. कराड यांनी व्यक्त केले. या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, प्रा. निरंजन खैरे व विष्णू भिसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

Latest Marathi News Live Update : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी निकाल लांबणीवर

Neeraj Chopra: दुखापतीनंतर नीरज चोप्रा थेट 'या' मोठ्या स्पर्धेतून मैदानात उतरणार! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निवडीबाबत मोठी अपडेट

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

SCROLL FOR NEXT