पुणे

कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्याअभावी लसीकरणाला ‘ब्रेक’

CD

पुणे, ता. १२ : कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीची कमतरता निर्माण झाल्याने १५ ते १८ वर्षे वयोगटातील लसीकरणाला शहरात ब्रेक लागला. लस घेण्यासाठी इच्छुक युवक आहेत, लसीकरण केंद्रे आहेत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची फळीदेखील आहे; मात्र लस नसल्याने केंद्रांची संख्या मर्यादित ठेवावी लागत आहे.

शहरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवक-युवतींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. या वयोगटातील युवकांना फक्त कोव्हॅक्सिनची लस देण्यात येत आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पहिल्या टप्प्यात ४० केंद्रांवर ही लस मिळत होती. पण, मुलांचा वाढता प्रतिसाद बघून या केंद्रांची संख्या १७९ पर्यंत वाढविली. त्यासाठी आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची फळी तयार केली. एकाचवेळी किशोरवयीन मुलांचे लसीकरण, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस आणि पहिल्या-दुसऱ्या डोसचे नियमित लसीकरण सुरू आहे. लसीकरणाचा असा ताण असूनही १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना पहिला डोस देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या केंद्रांवर महापालिकेने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन लशीची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे केंद्रांची संख्या कमी करावी लागत आहे.
राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्याला कोव्हॅक्सिनचे तीन लाख डोस मिळाले आहेत. ते पुणे महापालिका आणि जिल्ह्यांना वितरित करण्यात येतील. पुणे शहरालाही त्यातील काही लशींचा पुरवठा होईल.’’

कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, कोव्हॅक्सिन लशीचा सरकारकडून आणखी पुरवठा झाल्यास लसीकरण केंद्रांची संख्या वाढविता येतील. १५ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन ४० केंद्रांवर उपलब्ध केले आहे. १८ पेक्षा जास्त वयोगटासाठी १० केंद्रांवर व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० डोस ठेवले आहेत.
- डॉ. सूर्यकांत देवकर,
लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT