पुणे

फुरसुंगीमध्ये जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात

CD

पुणे, ता. १२ : संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म सोशल फाउंडेशनने फुरसुंगी येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन उत्साहात केले. यानिमित्त आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
एकता योग फुरसुंगी वर्गाने सूर्यनमस्कार व योगासने करून जिजाऊंना मानवंदना दिली. यावेळी शिवधर्म सोशल फाउंडेशन नामफलकाचे अनावरण केले. आनंदी परिवार व दिव्य स्पर्शी क्लिनिक यांच्या सहकार्याने संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी फुरसुंगी गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्यात दीडशे नागरिकांची बॉडी स्कॅनिंग चाचणी मोफत केली. ग्रामीण भागातून आलेल्या एमपीएससी-यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज अन्नछत्र सुरू करीत असल्याचे उज्‍वला कामठे यांनी सांगितले.
शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी जिजाऊ जन्माविषयी माहिती दिली. आनंदी परिवारचे डॉ. कुमार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे शाल व जिजाऊंची प्रतिमा देऊन स्वागत केले. कामठे यांनी सदगुरू वामनराव पै यांच्या विचारांचे दिनदर्शिका देऊन सर्व उपस्थितांचे स्वागत केले. गोरख कामठे यांनी सूत्रसंचालन केले.
संभाजी ब्रिगेडचे विवेक तुपे, अमोल मगर, मनोज गायकवाड, सचिन कामठे, बाळासाहेब लेंडे, भाऊसाहेब कामठे, सागर कामठे, सचिन झांबरे, विलास पवार, पांडुरंग शेलार, बाळासाहेब घोलप, रवींद्र मोडक, नंदकुमार सरोदे, विलास कामठे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Kolhapur Municipal Corporation: विरोधी पक्षनेता निवडीदरम्यान काँग्रेसचे अनिल रावळ यांना हार्ट अटॅक; कोल्हापूर महानगरपालिकेत दुर्दैवी घटना

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

SCROLL FOR NEXT