पुणे

भूकरमापकांनाही मिळणार लॅपटॉप

CD

पुणे, ता. १२ : तलाठ्यांपाठोपाठ आता भूकरमापकांनाही (मोजणी करणारे कर्मचारी) लॅपटॉप देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जागेवर हद्दी दाखवून मोजणी प्रकरणे तत्काळ निकाली काढणे सोयीचे होणार असून, मोजणीच्या कामकाजातसुद्धा गतिमानता वा पारदर्शकता येणार आहे. राज्यातील भूमि अभिलेख विभागाचे मुख्य काम जमिनीची मोजणी करून भूमि अभिलेखानुसार जमिनीच्या हद्दी कायम करणे, जमिनीवर झालेले पोटहिस्सा मोजणी करून त्याचे नविन पोटहिस्सा अभिलेख तयार करणे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करणे. मोजणी झाल्यानंतर मोजणी नकाशा तयार करतात, त्याचबरोबर भूमि अभिलेख त्यावर बसवून हद्दी दाखविणे, जमिनीच्या खुणा दर्शविणे, आदी कामे भूकरमापक करतात. या सर्व तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी लॅपटॉपची आवश्‍यकता आहे. जर लॅपटॉप पुरविले, तर जागेवर हद्दी दाखवून मोजणी प्रकरणे तत्काळ निकाली काढणे सोयीचे होणार आहे. जनतेच्या तक्रार निवारण होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ८०४ भूकरमापकांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला निधी उपलब्ध करून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT