पुणे

जिल्ह्यात दिवसभरात ८ हजार नवे रुग्ण

CD

पुणे, ता. १२ : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १२) दिवसभरात ८ हजार ३४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ८५७ रुग्ण आहेत. अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.
याउलट दिवसात ३ हजार १० जण कोरोनामुक्त झाले असून, अन्य तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ८०५ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ५९१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४२२, नगरपालिका हद्दीतील ११८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७४ जणांचा समावेश आहे.
बुधवारी दिवसभरात पुणे शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ११, नगरपालिका हद्दीत २५३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १५६ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात ३८ हजार ३६ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही ३८ हजार एक इतकी झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी १ हजार ७५२ जणांवर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरित ३६ हजार २४९ जण गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT