पुणे

रक्त चाचण्यांत वाढ नाही पुण्यातील प्रयोगशाळांचे निरीक्षण; कोरोना रुग्णांत सौम्य लक्षणे

CD

पुणे, ता. १४ : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली, तरीही बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत रक्त नमुन्यांच्या चाचण्यांची संख्या वाढली नसल्याचे निरीक्षण शहरातील प्रयोगशाळांनी नोंदविले.

शहरात डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. जानेवारीमध्ये एकेका दिवशी चार हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांचे निदान झाले. गेल्या वर्षी कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या मोठी होती. त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच, कोरोनाशी संबंधित वेगवेगळ्या रक्त नमुन्यांच्या चाचण्यांचे प्रमाणही वाढले होते. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने प्रयोगशाळांशी संपर्क साधला. त्या वेळी हे निरीक्षण नोंदविले.

‘ए. जी. डायग्नोस्टिक’च्या डॉ. अवंती गोविलकर म्हणाल्या, ‘‘शहरात रुग्णांची संख्या वाढत असली, तरीही रक्त तपासण्याची संख्या गेल्या लाटेच्या तुलनेत वाढली नाही. या आधीच्या लाटेमध्ये कोरोना संसर्गानंतर रुग्णाची प्रकृती ढासळत होती. सद्यःस्थितीत कोरोना झाल्यानंतर श्वसनमार्गाच्या वरच्या भागापुरता संसर्ग राहताना दिसत आहे. सर्दी, खोकला, एखादा दिवस ताप अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे रुग्णांना खूप अशा रोगनिदान चाचण्यांची गरज लागत नाही.’’


किशोर माने म्हणाले, ‘‘कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या वर्षी प्रमाणे मला सर्व रक्त चाचण्या कराव्या लागणार असे वाटत होते. पण, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी कोणत्याही रक्त चाचण्यांची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या वेळी कोरोना होऊनही रक्तचाचण्या केल्या नाहीत.’’

प्रयोगशाळा तंत्रज्ञ राहुल गारोळे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी आम्ही कोविड पॅकेज तयार केले होते. पॉझिटिव्ह येणारे बहुतांश रुग्ण हे पॅकेज घेत होते. या वेळी त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.’’


कोरोना रुग्णांच्या रक्त नमुन्यांच्या चाचण्या सध्या वाढल्या नाहीत. परंतु, ‘आरटी-पीसीआर’ चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. या वेळी रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असल्याने त्यांना चाचण्यांची गरज भासत नाही. कोरोना झाल्यामुळे ‘सीआरपी’, ‘डी-डायमर’ अशा काही रक्त तपासण्या करण्याचे
प्रमाण अत्यल्प आहे.
-डॉ. स्वप्नील कर्णिक, खजिनदार, इंडियन असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT