पुणे

पर्यटकांची संख्या थंडीमुळे रोडावली

CD

सोमाटणे, ता. ३१ ः कोरोनाचा वाढता प्रभाव आणि कडाक्याच्या थंडीमुळे पर्यटकांची संख्या रोडावल्याने रस्ते ओस पडले असून, पोलिस कारवाईला ब्रेक लागला आहे. पर्यटनस्थळी सध्या शुकशुकाट दिसून येत आहे.
कायम असलेले कोरोनाचे सावट व गेल्या तीन आठवड्यापासून सुरू झालेल्या कडाक्याच्या थंडीची तीव्रता कायम असल्याने शहरी भागातील पर्यटकांनी घरी राहनेच अधिक पसंत कले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई महामार्गावरील मोटारी, जीप या हलक्या वाहनांची संख्या घटली. परिणामी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांची संख्या घटली. त्यामुळे पोलिस कारवाई थंडावली आहे. काही नियमाच्या अधीन राहून मावळातील पर्यटन क्षेत्र खुली करण्यात आली. परंतु पर्यटकांची संख्याच घटल्याने मावळातील पर्यटकांचे आकर्षण असलेले कासारसाई, पवना धरण, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले, मावळातील आढले, पवना धरण परिसरातील कृषी पर्यटन केंद्र, माऊ, खांडी येथील हॉटेल आदी ठिकाणी पर्यटकांची संख्या कमी झाली. रविवार वगळता इतर दिवशी येथील पर्यटन क्षेत्री कोणीच येत नसल्याने व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. थंडीमुळे पन्नास टक्के पर्यटक कमी झाले असून, व्यावसायावर मोठा परिणाम झाला आहे, असे व्यावसायिक बाळासाहेब केदारी (कासारसाई), सुरेश कालेकर (पवनानगर) यांनी सांगितले.

उर्से टोलनाका ः रस्त्यावरील वाहनांची कमी झालेली संख्या.
कासारसाई ः धरणावर कमी झालेली पर्यटकांची संख्या.
Smt31Sf1,2.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : पुण्यात बी. जे. मेडिकल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT