पुणे

पक्षी अभयारण्यामधील राडारोडा उचला : ठाकरे

CD

पुणे, ता. १४ : येरवडा येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील राडारोडा उचलावा. तसेच सिमाभिंतीसह इतर दुरुस्तीची कामे तत्काळ करून त्याचा अहवाल सादर करा, अशा सूचना राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आणि वनविभागाला दिल्या.

या पक्षी अभयारण्याच्या दुरवस्थेबद्दल शहरातील पर्यावरणप्रेमी आणि पक्षी तज्ज्ञांनी ठाकरे यांच्यासह महापालिका आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, वनसंरक्षक राहुल पाटील, निवासी जिल्हाधिकारी हिम्मत खराडे, डॉ. सालीम अली अभयारण्य बचाव समितीचे सदस्य समीर निकम, मेघना बाफना, धर्मराज पाटील, महेश गवडीळ, सत्यम् नटराजन, पोर्णिमा जोशी उपस्थित होते.

ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींशी चर्चा करून अभयारण्यामधील परिस्थितीची या वेळी माहिती घेतली. त्यानंतर अभयारण्यात पडलेला राडारोडा तत्काळ उचलण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. तसेच सीमाभिंत, पक्षी सुरक्षा व आनुषंगिक कामे वनविभाग आणि महापालिका यांनी संयुक्तपणे पूर्ण करावेत, असे आदेश ठाकरे यांनी या वेळी दिले. ही कामे येत्या ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी या वेळी सांगितले.

अभयारण्यामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देऊन पर्यावरण प्रेमींशी चर्चा करावी, या अभयारण्यात सीसीटिव्ही कॅमेरे बसवाविण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT